वाकरे/प्रतिनिधी
शिंदेवाडी ( ता.करवीर) येथील ग्रामपंचायतीने फेब्रुवारी महिन्यात अतिक्रमणमुक्त केलेल्या साडेचार एकर जमिनीमध्ये १५ प्लॉट करून प्रतिप्लॉट ५१०० ते ७८०० रुपये दराने शेतकऱ्यांना वैरण करण्यासाठी ११ महीने करारावर भाडेतत्वावर देऊन उत्पन्नवाढीचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. सुमारे ४५ वर्षापूर्वीचे हे अतिक्रमण होते.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की गावातील गट क्रमांक २५५ मध्ये ग्रामपंचायतीच्या मालकीची साडे चार एकर गायरान जमीन होती.या जमिनीवर १९७४ पासून काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून जनावरांचा गोठा, गुऱ्हाळ घर तर काही जणांनी चक्क शेती केली होती.या अतिक्रमणाविरुद्ध ग्रामपंचायतीने न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्याचा निकाल ग्रामपंचायतीच्या बाजूने लागला होता. उच्च न्यायालयाने कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्यांना हे अतिक्रमण तातडीने हटवण्याचे आदेश दिले होते.त्याप्रमाणे २५ फेब्रुवारी २०२० रोजी ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवून गायरान जमीन अतिक्रमणमुक्त केली होती.
दरम्यान ग्रामपंचायतीच्या बैठकीत या जमिनीबाबत विधायक निर्णय घेऊन ही जमीन गावातील शेतकऱ्यांना लिलावाने भाडेतत्वावर वैरणीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे एकूण १८० गुंठे क्षेत्रावर प्रत्येकी १० गुंठ्याचे १५ प्लॉट पाडण्यात आले. या सर्व प्लॉटसचा खुल्या पद्धतीने लिलाव करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला.११ महिने वैरणीसाठी ही जमीन लिलावाने भाडेतत्वावर देण्याचे ग्रामपंचायतीने ठरवले. त्यासाठी प्रतिप्लॉट ५००० रुपये सरकारी बोली लावण्यात आली.
या सर्व जमिनीची प्रतवारी बघून ५
या सर्व जमिनीची प्रतवारी बघून ५१०० रुपयांपासून ७८०० रुपयेप्रमाणे या प्लॉटसचे चढ्या भावाने लिलाव झाले. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडणार आहे आणि ग्रामपंचायतीची जमीन सुरक्षित राहणार आहे. यासाठी सरपंच संपदा पाटील, उपसरपंच बळवंत सुतार, सदस्य अंबाजी पाटील, रवींद्र वडगावकर, उज्वला शिंदे, ग्रामसेविका शीतल पाटील तसेच शिवाजी पाटील, जोतीराम पाटील, भरत पाटील, पांडुरंग शिंदे,व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








