सोमवारी केवळ 4 नवे रुग्ण
प्रतिनिधी/बेळगाव
गेल्या 24 तासात जिल्हय़ातील 2 हजार 567 हून अधिक जणांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोमवारी केवळ चार नवे रुग्ण आढळून आले असून सक्रिय रुग्णांची संख्या 192 वर पोहोचली आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 79 हजार 726 इतकी झाली आहे. सोमवारी 12 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 78 हजार 606 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. मृतांचा सरकारी आकडा 927 वर पोहोचला आहे. अद्याप 462 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. अथणी, बैलहोंगल, गोकाक, खानापूर, रामदुर्ग, रायबाग, सौंदत्ती तालुक्मयात एकही रुग्ण आढळून आला नाही. बेळगाव व हुक्केरी तालुक्मयात प्रत्येकी एक व चिकोडी तालुक्मयात दोन असे एकूण चार रुग्ण आढळून आले आहेत.









