मोठे झाल्यावर मुलीचा होता मुलगा
मुलगा किंवा मुलगी होणे हे दैवाच्या हातात आहे. जन्मापूर्वीच आमचे जेंडर निश्चित झालेले असते. परंतु शस्त्रक्रियेद्वारे आता जेंडर बदलण्याची प्रगतीही माणसांनी केली आहे. जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांनी शस्त्रक्रियेच्या माध्यमातून स्वतःचे जेंडर बदलले आहे. पण पृथ्वीवर एक असेही गाव आहे, जेथे एका ठराविक वयानंतर मुली मुलं होऊ लागतात आणि ते देखील शस्त्रक्रियेशिवाय.
ठराविक वयानंतर या गावातील महिलांचे जेंडर आपोआप बदलते. यानंतर येथील मुलगी मुलगा होते. या गावाचे नाव ला सेलिनास असून ते डॉमिनिकन प्रजासत्ताक देशामध्ये आहे. या गावातील अनेक मुली वयाच्या 12 व्या वर्षांनंतर मुलामध्ये रुपांतरित होऊ लागतात. मुलींसोबत असे का घडते या रहस्याची उकल वैज्ञानिकांना आतापर्यंत करता आलेली नाही, पण मुलींसोबत होत असलेल्या या बदलामुळे लोक या गावाला शापित गाव मानतात.

ला सेलिनास गावातील मुली मुलगा होण्याच्या अजब आजारामुळे येथील लोक अत्यंत त्रस्त असतात. या गावावर एखाद्या अदृश्य शक्तीचे सावट असल्याचे अनेक लोकांचे मानणे आहे. तर काही वृद्ध गावाला शापित मानतात. या गावांमध्ये अशा मुलांना ‘ग्वेदोचे’ म्हटले जाते.
या गावातील लोक आता मुली जन्माला आल्यावर घाबरू लागले आहेत. केवळ एवढेच नाही तर गावात एखाद्या घरात मुलीचा जन्म झाल्यावर त्या कुटुंबात शोक पसरतो, कारण त्यांना मुलगी मोठी झाल्यावर मुलगा होण्याची भीती असते. या आजारामुळे गावातील मुलींची संख्या खूपच कमी होत चालली आहे. हे गाव समुद्रकिनारी वसलेले असून गावातील लोकसंख्या सुमारे 6 हजार इतकी आहे. अजब रहस्यामुळे हे गाव जगभरातील संशोधकांसाठी संशोधनाचा विषय ठरले आहे. तर हा आजार ‘आनुवांशिक’ असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या गावातील 90 पैकी एक मुलगा या आजाराने ग्रस्त असतो. ज्या मुलींमध्ये हा आजार असतो, त्यांच्यात ठराविक वयानंतर शरीरात पुरुषांसारखे अवयव निर्माण होऊ लागतात. तसेच त्यांचा आवाज भारदस्त होऊ लागतो आणि शरीरात बदल घडत हळूहळू मुलींपासून त्याला मुलाचे स्वरुप देतात.









