प्रतिनिधी/ सातारा
शिवशाही अपार्टमेंटच्या भिंतीचे काम अपूर्ण राहिले आहे. त्यावरुन चिडून जावून भाजपाच्या नगरसेविका तथा बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी काम करणाऱया ठेकेदारास मोबाईलवरुन शिवीगाळ केली. त्याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास शाहुपूरी पोलीस करत आहेत.
शाहुपूरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वसीम अप्पा तहसीलदार (रा. एकता कॉलनी) याने दिलेल्या फिर्यादीवरुन भाजपाच्या नगरसेविका सिद्धी रवींद्र पवार (रा. मंगळवार पेठ) यांनी दि. 1 जुन रोजी दुपारी 12 वाजता फोन करुन नगरपालिकेचे भिंतींचे काम दि. 25 एप्रिल 2021 पासून घेतले होते. त्या भिंतीमध्ये चिरा पडल्या होत्या. त्यावरुन शिवीगाळ केली. याचा तपास सपोनी जाधव हे करत आहेत.









