रत्नागिरी/प्रतिनिधी
रत्नागिरी विभागातून कोल्हापुर मार्गावरून आज सकाळ पासुन गाड्या सोडण्यात आल्या आहेत. उर्वरित गाड्या प्रवासाच्या प्रतिसाद नुसार सोडण्यात येतील. सातारा,पुणे, सोलापूर या मार्गावर ही आजपासून बसेस सोडण्याचा प्रयन्त असल्याची माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली.
आहे त्या तिकीट दरात सोशल डिस्टस्टींग ची अमलबजावणी करून प्रवासी सेवा देण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रवासाला ही पासची आवश्यकता नाही. गेली पाच महिने लालपरीला ब्रेक लागला होता मात्र गणेशोत्सव च्या मुहूर्तावर आता जिल्हा बाहेर एसटी ची सेवा सुरू करणयात आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी बुधवारी हिरवा कंदील दाखवला असून रत्नागिरी विभागातून आज सकाळी काही फेऱ्या कोल्हापूर मार्गावर सोडण्यात आल्या आहेत.