प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाला अखेर रविवारपासून सुरूवात झाली आह़े त्यामुळे खड्डेमय रस्त्यांमुळे त्रस्त झालेल्या रत्नागिरीकरांना आता काहीसा दिलासा मिळणार आह़े मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरातील रस्ते गुळगुळीत करणार असल्याचे जाहीर केले होत़े तसेच येत्या 10 ऑक्टोबरपासून कामाला सुरूवात होईल, अशी देखील माहिती पत्रकार परिषदेत दिली होत़ी त्यानुसार रविवारी प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आह़े
मागील 3 वर्षापासून शहरातील नळपाणी योजना, सीएनजी पाईपलाईन व केबल टाकण्याचे काम करण्यात येत होत़े त्यासाठी रस्त्यावर खोदकाम करण्यात येत होत़े यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले होत़े तसेच माती रस्त्यावर आल्याने पावसाळ्य़ात रस्ते निसरडेही झाले हेत़े नगर परिषदेच्यावतीने तात्पुरती रस्त्यांची डागडुजी करण्यात येत होत़ी मात्र जोरदार पडणाऱया पावसामुळे हे रस्ते पुन्हा खराब होत होत़े या खड्डेमय झालेल्या रस्त्यामधूनच रत्नागिरीकरांना जावे लागत होत़े
आता खोदाईचे काम पूर्ण झालेल्या भागात रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आह़े रस्ता डांबरीकरणाची कामे 4 टप्प्यात करताना नवीन तंत्रज्ञानाने केली जाणार आहेत. शहरात 35 कोटींची रस्ता कामे सुरू होणार आहेत. रस्त्याप्रमाणेच शहरातील काही गल्ल्यांमध्ये चेकर्स टाईल्स बसवण्यात येणार असून त्यासाठी नियोजनमधून 1 कोटी 89 लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे मंत्री सामंत यांनी घोषित केले होत़े मागील काही दिवसांत खडय़ांमुळे रत्नागिरीकरांना मनस्ताप सहन करावा लागला होत़ा तसेच विविध ठिकाणी चालणाऱया खोदकामामुळे अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटनाही समोर आल्या होत्य़ा पावसाळ्य़ात रस्त्यावर खड्डे की खडय़ात रस्ता, अशी अवस्था रत्नागिरीकरांची झाली आह़े या संदर्भात विविध व्हिडीओ तसेच मंत्री सामंत यांचे जुने व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकून व्यंग करण्यात येत होत़े आता प्रत्यक्ष कामाला सुरूवात होत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आह़े
विरोधकांच्या टिकेला उत्तर देताना मंत्री सामंत यांनी विरोधकांना मुंबई-गोवा महामार्गाची झालेल्या दुरवस्थेची आठवण करून दिली होत़ी तसेच रस्त्यांच्या डांबरीकरणासंदर्भात बोलताना सामंत म्हणाले की, रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप ते दांडा फिशरीज, थिबा पॅलेस रोड, नाचणे रोड व कोकणनगर रोड हे प्रमुख रस्ते काँक्रिटचे करण्यात येणार आहेत. त्यासाठी 94 कोटींचा डीपीआर बनवण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरात नळपाणी योजनेचे काम पूर्णत्वाकडे जात असताना सर्व नळधारकांना मोफत पाणीमीटर देणार आहे. त्यासाठी नगर परिषदेमार्फत साडेतीन कोटीचा निधी खर्च होणार आहे.









