ऑनलाईन टीम/तरुण भारत
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर आढळल्याच्या आरोपाखाली फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग तसंच इतर ४९ जणांविरोधात उत्तरप्रदेशात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र नंतर पोलिसांनी चौकशीदरम्यान मार्क झुकरबर्गचं नाव या प्रकरणातून वगळल्याची माहिती हाती येत आहे. उत्तरप्रदेशातल्या कनौज जिल्ह्यात न्यायालयाच्या आदेशानुसार ही केस नोंदवण्यात आली. सोमवारी मुख्य न्यायदंडाधिकारी धरमवीर सिंग यांनी कनौज पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. सरहती गावचे रहिवासी असणाऱ्या अमित कुमार यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.









