प्रतिनिधी/ सातारा
कोरोना काळात केलेल्या कामांचा पालिका कर्मचाऱयांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, या मागणीसाठी पालिकेच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करत अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली. नगराध्यक्षा माधवी कदम यांच्यासोबत चर्चा शिष्टमंडळाने केली.
संघटनेचे चंद्रकांत खंडाईत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोरोनाच्या काळात पालिका कर्मचाऱयांनी मेहनतीने काम केले आहे. जीवाची पर्वा न करता काम केले आहे. महाराष्ट्र नगरविकास विभागाच्या परिपत्रकानुसार जोखीम पत्करुन जोखीम पत्करुन काम करणाऱया कर्मचाऱयांना नियमीत वेतनाव्यतिरिक्त एक हजार इतकी प्रोत्साहनपर फक्त 1 हजार रुपये अदा करुन त्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. योग्य अर्थ काढून योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.









