ऑनलाईन टीम / पुणे :
अखिल दत्तवाडी उत्सव कमिटी ट्रस्टच्या अध्यक्षपदी शंकर मोटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवड पुढील तीन वर्षांसाठी झाली असून उमेश म्हस्के यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
नितीन गायकवाड यांची सचिवपदी निवड झाली आहे. वसंत कदम यांची खजिनदारपदी तर हिशोबनीसपदी सीए सुनील भांडवलकर यांची देखील यावेळी नियुक्ती झाली. विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम अखिल दत्तवाडी उत्सव कमिटीच्या माध्यमातून राबविण्यात येतात. दत्तवाडी येथे कोरोना काळात २ हजार कुटुंबांना अन्न धान्य वाटप करण्यात आले होते. तसेच आरोग्य शिबिर, रक्तदान शिबीर देखील आयोजित करण्यात आले होते.
शंकर मोटे म्हणाले, आरोग्याच्या दृष्टीने दत्तवाडीत सुसज्ज अशी रुग्णवाहिका ट्रस्टच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आयुर्वेदिक,होमिओपॅथिक दवाखाना चालू करण्याचा मानस मोटे यांनी व्यक्त केला. गरजू, होतकरू, एकल पालक विद्यार्थ्यांची वार्षिक शालेय जबाबदारी देखील घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.








