उपाध्यक्षपदी बाजीराव जाधव यांची निवड : कार्यकर्त्यांचा जल्लोष
प्रतिनिधी / जोयडा
अकेती ग्रा. पं. अध्यक्षपदी माया सुरेश नाईक व उपाध्यक्षपदी बाजीराव जाधव यांची अविरोध निवड करण्यात आली. या ग्रा. पं. मध्ये एकूण 13 सदस्य संख्या आहे. यात 10 भाजप व तीन काँग्रेस सदस्य निवडून आले आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून श्री. बाळकृष्ण होते. यावेळी भाजपचे सदस्य दीपक देसाई, गुरप्पा हणबर, लक्ष्मण देसाई, श्रीनाथ मळीक, पार्वती गावडे, सरिता सिंगाडे, मंजुळा भेटगार, नंदा पवार व काँग्रेसचे लक्ष्मी नाईक, पार्वती भादवकर उपस्थित होते. यावेळी कृष्णा देसाई, शाम मिठारी, रोमन डिलिसा, बाबाजी देसाई, कृष्णा गावकर, महादेव गावडे, संदीप यडवी,सदानंद देसाई, अपन्ना चोर्लेकर, शिवाजी देसाई आदी उपस्थित होते.









