अकलूज / प्रतिनिधी
अकलूज परिसरात आज, मंगळवारी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास तुफान पावसाला सुरुवात झाली. आज दिवसभर उकाडा जाणवत होता. मागच्या आठवड्यात पावसाने दिलेल्या तडाख्याने शेतकरी सावरतोय. तोच मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू झाल्याने आता शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जाणार आहे.
पावसाने उघडीप दिली होती तेव्हा मका उडीद काढण्याच्या कामाला वेग आला होता. मात्र सर्वत्र एकदमच कामे आल्याने मजुराने आपली मजुरी दुप्पट केली आहे. अचानक आलेल्या या पावसाने काढून पडलेल्या मालाची झाकून ठेवणे निवारा करण्यासाठी शेतकऱ्याची रात्री लगबग झाली आहे. सुमारे दोन तास चालू असलेल्या पावसाने पुन्हा एकदा सर्वत्र पाणीच पाणी झालेले आहे. परतीच्या पावसाने झोडपल्याने शेतकऱ्याचे आता कंबरडे मोडले. शिवाय राहणार नाही पीक विम्याची रक्कम त्वरित मिळावी. तसेच गेल्या आठवड्यात पंचनामे झालेल्या नुकसानभरपाई त्वरित मिळावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.
असाच पाऊस चालू राहिला तर रब्बी हंगामही वाया जाईल अशी भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. हा पाऊस माळशिरस तालुक्यात सर्वदूर असल्याचे चित्र आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









