जिल्हय़ात तीन वर्षात दोन कारवाया
गौरी आवळे / सातारा :
काळ्या जादूसह अंधश्रद्धेपोटी सामान्यपणे अनेक शेतात आढळणाऱ्या मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करण्यात येते. सातारा जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात वाई आणि सातारा येथील दोन तस्करी करणाऱ्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. केवळ अंधश्रद्धेपोटी वाढवणाऱ्या मांडूळाच्या किंमती मागणी आर्थिक घडीही तपासण्याचे आव्हान पोलीसांपुढे आहे.
जगभरात सापाच्या अनेक प्रजाती आहेत. तरीही मांडुळाचीच तस्करी करण्यात येते. या सापाची किंमत कोटय़ावधी रूपयांमध्ये असण्याची बरीच कारणे आहेत. ही अंधश्रद्धेशी निगडित आहेत. ही अंधश्रद्धा फक्त भारतापुरतीच मर्यादित नाही. तर युरोप आणि अमेरिकासारख्या प्रगत देशांमधून सुद्धा या सापाला मोठी मागणी आहे. जगभरातून मागणी असलेल्या या सापाची किंमत कमीत कमी तीन किलो किंवा त्याहून जास्त असावी लागते. तरच त्याला कोटय़ावधी किंमत मिळते. प्रत्येक मांडूळ साप हा तीन किलोपर्यंत वाढत नाही. तीन किलोपर्यंत वाढणारे मांडूळ हे खूपच दुर्मिळ असतात. या सापाबद्दल जनसामान्यांमध्ये बरेच गैरसमज आहेत. बऱयाच जणांना वाटते की या सापाला दोन तोंडे असतात. तो सहा महिने दुसऱ्या बाजूचे तोंड वापरतो. पण खरे सांगायचे तर या सापाला एकाच तोंड असते. त्याचा शेपटीकडील भाग हा त्याचा तोंडाच्याच जाडीचा असल्याने बऱ्याच जणांना मांडूळला दोन तोंडे असल्याचा भास होते.
पैशांचा पाऊस
कमीत कमी 3 किलोपर्यंत वाढलेल्या मांडुळावर जर तांत्रिक प्रयोग केले तर पैशांचा पाऊस पडतो अशी समजूत आहे. त्यामुळे धनाढय़ लोक भरपूर पैसे कमावण्याचा लालसेपोटी या मांडुळासाठी कोटय़वधी रूपये मोजायला तयार होतात. असे तंत्र मंत्र करणारे बाबा आणि बुवा याना या अंधश्रद्धेमुळे चांगले दिवस आले आहेत. हे विधी शक्यतो पौणिमा किंवा अमावसेच्या रात्री केले जातात. हे विधी मानवी वस्तीपासून दूर असलेल्या घरांमध्ये किंवा फार्महाऊस वर केले जातात. कारण या विधीसाठी मोठमोठय़ाने मंत्रांचा जाप करावा लागतो. विधी पूर्ण झाल्यानंतर मांडुळाचा बळी दिला जातो. शिरच्छेद केल्यानंतर सुद्धा हा साप बराच वेळ जिवंत राहतो. तो जोपर्यंत जिवंत असतो तो पर्यंत पैशांचा पाऊस पडतो अशी समजूत आहे.सोने बनवण्यासाठी वापर मांडुळाच्या शरीरात मिळणाऱया रसायनांमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या जंगली वनस्पतीचा रस आणि विशिष्ट प्रकारची माती मिसळली जाते. ही माती वाळवंटी प्रदेशात आढळून येते. हे मिश्रण बऱयाच वेळ पर्यंत गरम केले जाते. मांडुळाचा आकार जेवढा मोठा तेवढेच त्यापासून मिळणाऱया सोन्याचे प्रमाण जास्त या सोन्याच्या हव्यासापोटी मांडुळाची तस्करी केली जाते.
चिरतरूण राहण्याच रहस्य
हा साप खाल्याने सर्व आजार बरे होतातच. पण त्याच बरोबर वाढत्या वयाचे शरीरावर होणारे परिणाम सुद्धा थोपवले जातात असा एक समज आहे. मनुष्यास चिरतरूण ठेवण्याचा मांडुळाच्या या गुणामुळे श्रीमंत महिलावर्गातून यास मोठी मागणी आहे. जगभर बऱयाच देशांमध्ये सापाचे सेवन केले जाते. पण मांडुळामध्ये आढळणारे गुणधर्म इतर सापांमध्ये आढळत नाहीत.