दोडामार्ग / वार्ताहर:
सोनवल गावातील स्थित श्री. सातेरी देवी भूतनाथ मंडळ मुंबई यांच्या वतीने सोनावले येथे सॉफ्टवेअर व अंगणवाडीसाठी बाहुली घर हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे नुकतेच उद्घाटन संपन्न झाले. आजच्या युवा पिढीला डिजिटल युगातही चांगली पुस्तके वाचण्याशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन यावेळी उपस्थित सर्वांनीच केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रामचंद्र गवस उपस्थित होते. तसेच मंडळाचे अध्यक्ष शिवाजी गवस, वैभव गवस, मंगेश देसाई, मोहन बिर्जे, श्री. घोगळे, श्री. सोनवलकर, नंदकिशोर म्हापसेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. जी. पाटील यांनी केले तर प्रास्ताविक नंदकिशोर म्हापसेकर यांनी केले.









