विविध समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
अंगणवाडी कर्मचारी महिला आरोग्य विभागाची कामे तसेच मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र त्यांच्या नोकरीची सुरक्षिततः नसल्याने आम्ही संभ्रमात अडकलो आहे. आम्हाला वेतनदेखील वेळेत देण्यात येत नाही. त्यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे. तेंव्हा नोकरीची सुरक्षितत तसेच आमच्या समस्या सोडवाव्यात या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस फेडरेशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन निवेदन देण्यात आले.
एलकेजी, युकेजी अंगणवाडीलाच जोडाव्यात, कारण अंगणवाडी कर्मचारी लहान मुलांना शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत योग्य प्रकारे काम करत या महिला आल्या आहेत. सरकारी योजनांची जनजागृती याचबरोबर आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱया विविध योजना घरांपर्यंत जावून देत आहेत. विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार तसेच त्यांना पौष्टिक आहार देण्याचे कामही करत आहेत.
जुलै 2019 महिन्याचे वेतन अजून देण्यात आले नाही. कोरोना काळात आम्ही रात्रदिवस काम केले आहे. असे असताना सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे. तेंव्हा आमच्या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली. वेतना वाढ करणे गरजेचे. सरकारी कर्मचाऱयांप्रमाणे आम्हालाही वेतन तसेच भविष्यनिर्वाह निधी द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी ऍड. नागेश सातेरी, यल्लु शिगीहळ्ळी, मिनाक्षी कोटगी, सुजाता बेळगावकर, मंगल पाटील यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या









