वृत्तसंस्था/ मुंबई
25,000 डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या आयटीएफ महिलांच्या टेनिस स्पर्धेत भारताची महिला टेनिसपटू अंकिता रैनाने दुहेरीची अंतिम फेरी तर एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.
शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अंकिताने स्वीसच्या सिमोना वेलटर्टचा 6-4, 4-6, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. अंकिताचा उपांत्य फेरीचा सामना स्वीसच्या कुंगशी होणार आहे. या स्पर्धेतील दुहेरीच्या लढतीत अंकिताने हॉलंडच्या स्कूफ्ससमवेत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पुरूषांच्या चॅलेंजर्स टेनिस स्पर्धेत भारताच्या पुरव राजा आणि त्याचा कॅनडाचा साथीदार शमसद्दीन यांनी दुहेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.









