शेतकऱ्यांनी पीक नोंदणी करून घेण्याचे प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांचे आवाहन
कणकवली / प्रतिनिधी:
‘ई पीक पाहणी’ अँपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाबाबतची माहिती फोटोसह नोंद करावयाची आहे. ही माहिती तलाठ्याकडून ‘व्हेरिफिकेशन’ करून अद्ययावत केली जाणार आहे. यासाठी 30 सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे. जर या कालावधीत ही माहिती नोंदणी न केल्यास आपले क्षेत्र पड दिसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक, तलाठी, कृषी मित्र आदींच्या सहकार्याने पीक नोंदणी करावी, असे आवाहन प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी केले.
येथील तहसीलदार कार्यालयात सौ. राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, विमा प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार आर. जे. पवार, नायब तहसीलदार एस. व्ही. राठोड, तालुका कृषी अधिकारी शिवाजी हजारे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी अँड्रॉइड फोनवर पीक पाहणी अँप डाऊनलोड करून घेऊन त्या माध्यमातून ही नोंदणी करावयाची आहे. यासाठी शेतकऱ्यांना गावपातळीवर कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक, कृषी मित्र, तलाठी हे मदत करणार आहेत. सदरचे अँप घेतल्यानंतर अत्यंत साध्या सोप्या व मराठी भाषेत ही नोंदणी करता येते. त्यानुसार माहिती भरून पिकाचा फोटो अपलोड करावयाचा आहे. शेतकऱ्यांनी ही माहिती भरल्यानंतर तलाठ्यामार्फत त्याचे व्हेरिफिकेशन करून ही माहिती अद्ययावत केली जाणार आहे. या पद्धतीमुळे पीक पाहणी नोंदीतील आक्षेप कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच कोणती लागवड केलेली आहे याबाबतचा डाटा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या नोंदीमुळे बँक पीक कर्ज, विमा, आपत्ती अनुदान देण्यासाठी शासनाकडे खातेदार निहाय व पीक निहाय डाटा उपलब्ध होणार आहे. तसेच शेती, बागायती इतर फळपिके जलसिंचन आदीबाबतचा डाटाही उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत ही माहिती भरल्यानंतर आपल्याकडे कोण कोणत्या प्रकारची पिके घेतली जातात, क्रोपिंग पॅटर्नआदी बाबतची माहिती उपलब्ध होणार आहे.राज्यातील 15 तालुक्यांमध्ये या अँपच्या माध्यमातून पीक पाहण्याची अचूक नोंद यशस्वी झाल्यानंतर राज्य भरासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी ही नोंद न केल्यास त्यांचे क्षेत्र पड दिसणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत ते लगतच्या शेतकरी किंवा आपल्या अन्य शेतकऱ्यांच्या मदतीने ही नोंद करू शकतात. कारण एका मोबाईल वरून वीस खातेदारांची नोंद करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबतचे मार्गदर्शन घेऊन ह्या अँपच्या माध्यमातून आपली पीक पाहणनीची नोंद करावी, असे आवाहन सौ. राजमाने यांनी केले. कृषी विभागाने या अँपच्या प्रसार व प्रसिद्धीसाठी तातडीने कार्यवाही सुरू करण्याच्या सूचनाही सौ. राजमाने यांनी यावेळी दिल्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









