शुल्क 20 टक्क्यांनी वाढले : 10 ऐवजी 12 रुपये होणार आकारणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो यावरुन आता खाण्याची ऑर्डर देणे महाग होणार आहे. कारण कंपनीने प्लॅटफॉर्म शुल्कामध्ये 20 टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे आता ग्राहकांना ऑर्डर शुल्क 10 रुपयांवरुन 12 रुपये द्यावे लागणार असल्याची माहिती आहे.
यामुळे वाढविले शुल्क
येत्या काळात सणासुदीचा कालावधी असून यामध्ये दिवाळी, नवरात्र आणि इतर सणांप्रमाणे, लोक बाहेरून जास्त खाद्यपदार्थ ऑर्डर करतात. या काळात, झोमॅटोच्या ऑर्डरची संख्या लक्षणीयरीत्या वाढते. यासाठी ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, कंपनीला डिलिव्हरी सिस्टम, कर्मचारी आणि तांत्रिक संसाधनांवर अतिरिक्त खर्च करावा लागतो. हा खर्च संतुलित करण्यासाठी, कंपनीने प्लॅटफॉर्म फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वीही वाढवले शुल्क
झोमॅटोने यापूर्वी वेळोवेळी आपले शुल्क वाढवले आहे. गेल्या वर्षी, सणासुदीच्या काळात, कंपनीने शुल्क 6 रुपयांवरून 10 रुपये केले होते. त्यापूर्वी ते 5 ते 6 रुपये होते. यावेळी, 20 टक्क्यांच्या वाढीसह, ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरवर 2 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.
शेअरचा वर्षात 30 टक्के परतावा
झोमॅटोचे शेअर्स 323 रुपयांवर स्थिर व्यवहार करत आहेत. कंपनीच्या शेअर्सनी या वर्षी आतापर्यंत सुमारे 17 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यात 45 टक्के आणि एका वर्षात 30 टक्के परतावा दिला आहे.









