वृत्तसंस्था/ मुंबई
ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱया झोमॅटो लिमिटेडकडून मार्च तिमाहीतील नफा कमाईचे आकडे सादर करण्यात आले आहेत. कंपनीला सदरच्या तिमाहीत तोटा झाला असून तो वाढत 360 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एक वर्षाच्या अगोदर समान कालावधीत कंपनीला जवळपास 131 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
साधारणपणे यामध्ये कंपनीला जवळपास तीन पट तोटा झाला असून कंपनीचा महसूल 75 टक्क्यांनी वधारुन 1212 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो मागील वर्षात 692 कोटी रुपये होता. सोमवारी शेअर बाजारात एनएसईवर 2.15 टक्के घसरण होत समभाग 56.80 रुपयांवर बंद झाला आहे.
ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू उच्चांकावर
झोमॅटोच्या तिमाही दरम्यान ग्रॉस ऑर्डरची व्हॅल्यू तिमाहीआधारे 6 टक्के आणि वर्षाच्या आधारे 77 टक्क्यांनी वधारुन 5,850 कोटी रुपयांच्या विक्रमावर पोहोचली आहे.
300 पेक्षा अधिक नवीन शहरांमध्ये सेवा
आर्थिक वर्ष 2022 मध्ये जवळपास 300 पेक्षा अधिक नवीन शहरांमध्ये आपली सेवा सादर केली आहे.









