पुलाची शिरोली/वार्ताहर
येथील ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या झिम्मा फुगडी स्पर्धेत घोडेगिरी महिला मंडळाने विजेतेपद पटकवले. स्पर्धेचा शुभारंभ सरपंच सौ. पद्मजा करपे यांच्या हस्ते फोटो पुजनाने करण्यात आला.सौ. मंगलताई महादेवराव महाडिक, गोकुळ दूध संघाच्या संचालिका सौ. शौमिका अमल महाडिक व सौ ग्रिष्मा स्वरूप महाडिक यांनी उपस्थिती लावून संयोजकांना मार्गदर्शन केले.
स्पर्धेच्या निमित्ताने स्पाॅट गेम्स ची आकर्षक दहा बक्षिसे ठेवण्यात आली होती. संघांनी सामाजिक संदेश देत माझी वसुंधरा अभियान याचा देखील उल्लेख आपल्या सादरीकरणात केला. मोठ्या संख्येने महिला कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.कार्यक्रमासाठी मनोरंजन व पारंपारिक गाणी माऊली गावडे यांनी गायीली. सुत्रसंचलन राजलक्ष्मी कदम यांनी केले.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे प्रथम क्रमांक:- घोडेगिरी महिला मंडळ, द्वितीय क्रमांक:- माऊली ग्रुप , तृतीय क्रमांक:-सावित्रीबाई महिला मंडळ उत्तेजनार्थ क्रमांक:-राजमाता जिजाऊ गट यावेळी सौ. धनश्री खवरे, सौ.कमल कौंदाडे, सौ. सुजाता पाटील, सौ. मनीषा संकपाळ,सौ. कोमल समुद्रे, सौ. भारती व्हनागडे, सौ.मगल शिंदे, सौ. नजीया देसाई , कुमारी.हर्षदा यादव.वसिफा पटेल, आदींसह गावातील ज्येष्ठ महिला उपस्थित होत्या.









