वृत्तसंस्था/ बुलावायो
द. आफ्रिकेबरोबर येथे झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीतील खेळाच्या पहिल्याच दिवशी मैदानावर चेंडू धोकादायक टाकल्याने झिंबाब्वेचा वेगवान गोलंदाज कुंडाई मतीगिमुला शिस्तपालन समितीने दंड ठोठावला आहे. तसेच त्याला बेशिस्त वर्तनाबद्दल एक गुण मिळाला आहे.
या कसोटीतील खेळाच्या पहिल्या दिवशी द. आफ्रिकेच्या पहिल्या डावातील 72 वे शतक सुरू असताना मतीगिमुने स्वत:च्याच गोलंदाजीवर फलंदाजाने मारलेला फटका अडविला आणि तो प्रेटोरियसच्या दिशेने फेकला. त्याचा हा वेगवान चेंडू प्रेटोरियसच्या मनगटापासून कांही अंतरावरून गेल्याने तो जखमी झाला नाही. या घटनेची नोंद करून आयसीसीच्या शिस्तपालन समितीने मतीगिमुला मिळणाऱ्या सामना मानधनातील 15 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावला आहे.









