लंकेचा 80 धावांत खुर्दा : झिंबाब्वे पाच गड्यांनी विजयी
वृत्तसंस्था/ हरारे
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत येथे झालेल्या लंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात यजमान झिंबाब्वेने लंकेचा केवळ 80 धावांत खुर्दा पाडत 5 गड्यांनी शानदार विजय मिळविला.
या मालिकेतील झालेल्या दुसऱ्या सामन्यात झिंबाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. झिंबाब्वे संघातील वेगवान गोलंदाज मुझारबनीने डावातील दुसऱ्या षटकात लंकेला पहिला धक्का दिला. त्याने कुशल मेंडीसला बाद केले. यानंतर लंकेचा डाव त्यांच्या खेळाडूंना सावरता आला नाही. पी. निशांका इव्हान्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. झिंबाब्वेच्या भेदक आणि अचूक गोलंदाजीसमोर लंकेचे फलंदाज झटपट बाद झाले. लंकेचा शनाका आणि आसालेंका यांनी 26 धावांची भागिदारी केली. सिन विल्यम्सने शनाकाला झेलबाद केले. सिकंदार रझाने असालेंकाला तसेच त्यानंतर डी. चमिराला बाद केले. लंकेची यावेळी स्थिती 8 बाद 66 अशी होती. डी. हेमंता धावचीत झाला. सिकंदर रझाने या सामन्यात 4 षटकात 3 धावांच्या मोबदल्यात 11 धावा तर इव्हान्सने 2.4 षटकात 15 धावांत 3 बळी मिळविले. शनाका आणि असालेंका यांनी 26 धावांची भागिदारी केली. कर्णधार रझाने लंकेच्या कमिंदू मेंडीसला 7 व्या षटकात पायचीत केले. रझाने आसालेंकाला बाद केले. तसेच त्याने चमिराला आपल्या या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बाद केले. लंकेची यावेळी स्थिती 8 बाद 66 अशी होती. लंकेच्या तळाच्या फलंदाजांनी 11 धावांची भर घातली. हेमंता धावचीत झाला. महेश तिक्ष्णा इव्हान्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना झिंबाब्वेने 14.2 षटकात विजयाचे उद्दिष्ट गाठले. रेयान ब्युरेलने नाबाद 20 तर मुसकिव्हाने नाबाद 21 धावा झळकाविल्या. लंकेच्या चमिराने 19 धावांत 3 गडी बाद केले. आयसीसीचे टी-20 प्रकारात झिंबाब्वेची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. रझाने 11 धावांत 3 तर इव्हान्सने 15 धावांत 3 गडी बाद केले. हरारेच्या याच मैदानावर 2021 च्या एप्रिलमध्ये पाकचा डाव 99 धावांत आटोपला होता. लंकेची टी-20 मधील ही दुसरी निश्चांकी कामगिरी आहे. टी-20 प्रकारात निश्चांकी धावसंख्या गाठणाऱ्या संघामध्ये गांबिया (54 धावा), मोझंबियाक (56 धावा), रेवांडा (71 धावा) आणि कॅनडा (75 धावा).
संक्षिप्त धावफलक : लंका 20 षटकात सर्वबाद 83, झिंबाब्वे 14.2 षटकात 5 बाद 84 (मुसिकिव्हा नाबाद 21, ब्यूरेल नाबाद 20).









