वृत्तसंस्था/ बुलावायो, झिम्बाब्वे
झिम्बाब्वे व अफगाणिस्तान या दोन्ही संघांनी येथे अनिर्णीत राहिलेल्या कसोटी सामन्यात विक्रमी धावसंख्या रचली. यजमान झिम्बाब्वेने पहिल्या डावात सर्व बाद 586 धावा जमवित याआधी 2001 मध्ये विंडीजविरुद्ध मायदेशात केलेल्या 9 बाद 563 धावांचा विक्रम मागे टाकला. प्रत्युत्तरात अफगाणने पहिल्या डावात सर्व बाद 699 धावा जमविल्या. रहमत शहाने 234, कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने 246 धावा जमविताना तिसऱ्या गड्यासाठी अफगाणतर्फे 364 धावांची विक्रमी भागीदारी केली. कोणत्याही गड्यासाठीची त्यांची ही विक्रमी भागीदारी आहे. यापूर्वी झिम्बाब्वेविरुद्धच अफगाणने 4 बाद 545 धावांचा विक्रम 2021 मध्ये नोंदवला होता. येथील सामन्यात झिम्बाब्वेने दुसऱ्या डावात 4 बाद 142 धावा जमविल्या. गुरुवारपासून त्यांचा दुसरा कसोटी सामना बुलावायो येथे सुरू होणार आहे. कसोटीत सर्वोच्च धावसंख्येचा विश्वविक्रम असून त्यांनी 1997 मध्ये कोलंबोत भारताविरुद्ध 6 बाद 952 धावा जमविल्या होत्या. हा सामनाही अनिर्णीत राहिला होता.









