जत तालुक्यातील संख येथील प्रकार; पालक वर्गातून संताप
संख, वार्ताहर
सांगली जिल्ह्यात सगळीकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अगदी मोठ्या थाठात व विद्यार्थ्यांचे स्वागत करून काही ठिकाणी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांना स्वागत करण्यात आले व शाळेच्या पहिल्याच दिवशी जत तालुक्यात पाठ्यपुस्तके देण्यात आले परंतु जतपूर्व भागातील संख येथील वाघोली वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्नड काल पहिल्याच दिवशी शाळेला चक्क शिक्षक नसल्याने सलग दोनन दिवस झाले शाळा उघडले नाही विद्यार्थ्यांची शाळेसमोर तासंतास ताटकळत राहून परत येण्याची वेळ आली आहे. याबाबत पालक संतोष सुभाष चंद्र पाटील यांनी सदर शाळेला शिक्षक का नाही. हे सदर शाळेला का शिक्षक दिले नाही यांची गटशिक्षणाधिकारी ,विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांना माहिती नाही का असे प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की सांगली जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून लहान चिमुकले घरात खेळत बागडत होते परंतु 15 जून रोजी शाळा सुरू होणार त्या मुळे मुले शाळेत हजर झाले त्या विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व विविध मान्यवराकडून पाठ्यपुस्तके मोफत देण्यात आले एवढे असताना देखील जत तालुक्यातील येथील वाघोलीवस्ती येथील येथील वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांची बदली झाले आहे. परंतु त्या ठिकाणी दुसरा एक शिक्षक नेमणूक करण्याची गरज होती परंतु शिक्षण विभागाने या कडे दुलंक्ष केले आहे .त्यामुळे काल शाळेला पहिल्याच दिवशी शाळेला शिक्षक नसल्याने पालक वर्गातून तिव्र संताप व्यक्त होत आहे.
तरी संख येथील वाघोली वस्ती येथील पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा असून पण संख्या ही चांगल्या प्रमाणेच आहे परंतु काल पहिल्याच दिवशी शाळा उघडल्या नसल्याने काही विद्यार्थी रडत घरी आल्याचे समजते तरी शाळा का सुरू केली नाही याची चौकशी वरिष्ठांनी घ्यावी अशी मागणी संतोष पाटील येथील पालक आहे यांनी केला आहे.









