कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्यावतीने दिला जाणारा यंदाचा प्रोत्साहनपर आदर्श शिक्षिका पुरस्कार मेन राजाराम कोल्हापूर च्या उच्च माध्यमिक विभागाकडील प्रा. सुषमा अरुण पाटील यांना देण्यात आला आहे. प्रशासकीय पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या समितीकडून दहा वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या पुरस्काराच्या त्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत.
आकुर्डे तालुका भुदरगड येथील सुषमा पाटील या 2001 ते 12 या काळात गारगोटी येथील विनाअनुदानित इंग्रजी माध्यमिक शाळेत कार्यरत होत्या. 2012 ते 19 च्या दरम्यान जिल्हा परिषदेच्या एम आर कॉलेज गडहिंग्लज येथे उच्च माध्यमिक विभागाकडे सेवा केली. त्यांना मराठी, हिंदी, समाजशास्त्र या विषयात अध्यापचा अनुभव आहे. सध्या त्या मेन राजाराम भवानी मंडप कोल्हापूर येथे उच्च माध्यमिक विभागाकडे कार्यरत आहेत. त्यांची जिल्हा व जिह्याच्या बाहेर आतापर्यंत 400 च्या वर विविध विषयावर व्याख्याने झाली आहेत. अध्यापनातील विविध प्रयोग, उपक्रमशील शिक्षका म्हणून त्यांची दखल घेऊन अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. शासकीय व इतर सामाजिक कार्यक्रमात उत्तम निवेदिका म्हणून त्यांना दीर्घ अनुभव आहे या संपूर्ण कार्याची दखल घेऊन आता जिल्हा परिषदेच्या वतीने शासकीय समितीने मुलाखतीद्वारे त्यांची प्रोत्साहनपर आदर्श शिक्षिका म्हणून निवड केली आहे









