नांद्रे / महेबूब मुल्ला :
चोवीस तास रूग्णसेवा देणारे नियमीत रूग्णवाहिकेवर चालक म्हणून कार्यरित असणाऱ्याह चालकांना सहा महिने पगारच मिळालेला नाही. त्यामुळे रूग्णवाहिका चालक आर्थिक संकटात सापडलेला आहे. शासनाकडून वेळेत निधीच येत नाही. आल्यास कंत्राटदार पगार देताना कपात करत मनमानी करत आसल्याने याबाबत ठोस तोडगा काढण्याची मागणी रूग्णवाहिका चालकांतून होत आहे.
गेल्या काही वर्षापासून रुग्णवाहिका चालकांचे वेळेत व योग्य पगार होत नाही, अश्या तक्रारी आहेत. त्यामुळे चालकांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंन्द्रात कार्यरत असलेल्या नियमित रूग्णवाहिका चालक सहा महिन्यापासून पगाराच्या प्रतिक्षेत आहेत. शासनाकडून रूग्णवाहिका चालकांचे पगार देण्यासाठी निधी आला आसल्याचे सूत्राकडून माहिती मिळते. प्राप्त निधीतून पगार देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र अजूनही पगार जमा झाला नाही. याबाबत प्रशासनाकडे ठोस माहिती नाही. त्यामुळे वाहन चालकांचा पगार होणार कधी ? असा सवाल उपस्थित होत आहे.
गेल्या सहा महिन्यापासून पगार मिळाला नसल्याने चालक आर्थिक संकटात सापडलेला आहे. पगार न झाल्यामुळे चालकांची बिकट अवस्था झाली आहे. यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
वारंवार अपघाताच्या घटना घडत असतात. तसेच सर्पदंश सारख्या घटना वारंवार घडत आसतात, गोरगरीब, सर्वसामान्य महिलाचे बाळतंपण, हृदयविकार आदी गंभीर घटना सतत घडत असतात. घटनेदरम्यान जखमीस, अन्य रूग्णास तातडीने उपचार व अत्यावश्यक रूग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत असल्याने अनेक रूग्णावर उपचार होतात, व रूग्ण मूत्यूच्या दाढेतून वाचतात. त्या रुग्णवाहिका चालक आपल्या जीवाची बाजी लाऊन रूग्णांना वेळेत रुग्णालयात पोहचवतात व त्याचे प्राण वाचवतात.
परंतु अनेक रूग्णांचे प्राण वाचवणार्या रूग्णवाहिका चालकांचा सहा सहा महिने पगार होत नसल्याने रूग्णवाहिका चालकावर उपसमारीची वेळ आली आहे. त्यांना वेळेवर व योग्य पगार व्हावा, आशी मागणी समस्त नागरिकांतून पण होत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, आरोग्यमंत्री यांच्यासह जि. प. सीईओ यांनी लक्ष घालून रूग्णवाहिका चालकांना पगार मिळेल, अशी व्यवस्था करावी.








