वृत्तसंस्था/ हुआ हिन, थायलंड
येथे झालेल्या थायलंड ओपन महिला टेनिस स्पर्धेत एकेरीत झु लिनने पहिले डब्ल्यूटीए अजिंक्यपद मिळविताना अंतिम फेरीत लेसिया त्सुरेन्कोचा पराभव केला.
लिनने त्सुरेन्कोवर दोन चुरशीच्या सेट्समध्ये 6-4, 6-4 असा विजय मिळवित जेतेपद पटकावले. सुमारे पावणेदोन तास ही लढत रंगली होती. लिनने आपल्या खेळात मोठी सुधारणा झाली असल्याचे दाखवून देताना ऑकलंडमधील स्पर्धेत मारिया सॅकेरी, व्हीनस विल्यम्स यासारख्या अव्वल खेळाडूंना पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व व ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये चौथी फेरी गाठली होती. ती लवकरच टॉप 20 मध्ये स्थान मिळवेल, असे भाकीतही करण्यात येत आहे.









