ठोस आश्वासना अभावी बीएसएनएल अधिकारी आणि ग्रामस्थांमधील चर्चा निष्फळ
ओटवणे प्रतिनिधी
झोळंबे गावातील बिएसएनएलच्या प्रस्तावित टॉवरबाबत गेल्या २० दिवसात कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे बीएसएनएलचे अधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा निष्फळ ठरली असून १५ ऑगस्टच्या उपोषणावर झोळंबे ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ ठाम राहिले आहेत.
फुकेरी टॉवर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासह गावातील मंजूर टॉवर बाबत तात्काळ कार्यवाही करण्यासाठी झोळंबे ग्रामपंचायत पदाधिकारी आणि मस्तानी १५ ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर फुकेरी टॉवर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आला. मात्र गावात मंजूर असलेल्या टॉवरसाठी ग्रामपंचायतने जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर अधिकारी वर्गाने ही जुलै अखेर हा टॉवर कार्यान्वित करण्याची ग्वाही दिली होती. परंतु या दरम्यान कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळेच उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. मात्र गेल्या वीस दिवसात कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच अधिकारी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीतही ठोस आश्वासनाभावी चर्चा निष्पळ ठरली. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी झोळंबे गावात उपोषणाच्या निर्णयावर झोळंबेवासिय ठाम राहिले आहेत.
यावेळी सरपंच विशाखा नाईक, उपसरपंच विनायक गाडगीळ, माजी सरपंच सतीश कामत, बीएसएनएलचे मोबाईल विभाग प्रमुख गंगावर्ते, प्रल्हाद पुण्यवंत, किरण तर्टे, राजेश गवस, माजी उपसरपंच पांडुरंग गवस, ग्रामपंचायत सदस्य सौ. संजना गवस, उज्वला कांबळे, सौ. विनीता गवस, विशाल गवस, सुधीर गवस, शिवराम गवस, मनोहर गवस, सिद्धेश झोळंबेकर, बंटी झोळंबेकर, श्री तेंडुलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.









