रक्ताच्या गाठी तयार होत हृदयविकाराच्या धक्क्याच जोखीम
क्लीवलँड क्लिनिक लर्नर रिसर्च इन्स्टीटय़ूटने युनायटेड किंगडम आणि युरोपमध्ये सुमारे 4 हजार लोकांच्या नमुन्यांद्वारे स्वीटनरचा प्रभाव पडताळून पाहिला आहे. कमी वेळाताच एरिथ्रिटोल स्वतःचा प्रभाव दाखवून देत असल्याचे यात आढळून आले आहे. रक्तात त्याची पातळी वाढत जाते, ज्यामुळे ब्लड क्लॉटिंगमुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची जोखीमही वेगाने वाढत असल्याचे नेचर नियतकालिकात प्रकाशित अध्ययनात नमूद करण्यात आले आहे.

एरिथ्रिटोलमध्ये थ्रोम्बोसिस म्हणजेच रक्ताच्या गाठी तयार करणारा गुणधर्म असतो. हे प्लेटलेट्सला अधिक प्रतिसादक्षम करतात. याचमुळे 10 टक्क्यांपेक्षा कमी एरिथ्रिटोल 90 ते 100 टक्क्यांपर्यंत क्लॉट फॉर्मेशन करू शकतात असे संशोधकांनी म्हटले आहे. झिरो शूगर ज्युस पसंत करणारे लोक अधिक जोखिमीत आहेत, कारण ते एरिथ्रिटोलचे मोठय़ा प्रमाणात निर्भयपणे सेवन करतात, झिरो शुगर म्हणजेच कुठलाच धोका नाही असे ते मानत असतात, परंतु प्रत्यत्रात ब्लड प्लेटलेट्समध्ये क्लॉटिंगची प्रवृत्ती वाढत असते. लो किंवा झिरो कॅलरी स्वीटनर सुरक्षित असल्याचे दीर्घकाळापासुन सांगण्यात येत आहे, परंतु आता कार्डियोवस्कुलर आजारांचा धोका जाणण्यासाठी यावर जागतिक नियमनाची गरज असल्याचे बोलले जात आहे.
एरिथ्रिटोल म्हणजे काय?
एरिथ्रिटोल एक आर्टिफिशियल स्वीटनर असून त्याचा वापर खाद्योत्पादनांमध्ये गोडपणाचा पर्याय म्हणून केला जातो. नैसर्गिक स्वरुपात हे मशरुम, द्राक्षे, टरबूज इत्यादी फळांमध्ये आढळून येते. तर फर्मेंट गोष्टीमध्ये सोया सॉस, मद्य आणि चीजमध्येही याचे मोठे प्रमाण असते. कृत्रिमद्वारे देखील याची निर्मिती केली जाते. फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने याला सुरक्षित ठरविल्यावर याचे सेवन करण्याचे प्रमाण वाढत गेले आहे.
साखरेपेक्षा जवळपास 70 पट गोड या गोष्टीत कॅलरी नसते. याचमुळे कॅलरी टाळू इच्छिणाऱया लोकांना हे पसंत असते. तसेच मधुमेहाच्या रुग्णांच्या आहारातही हा हिस्सा होत जातो. स्वतःचा पूर्ण वैद्यकीय इतिहास सांगितल्यावर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच आर्टिफिशियल स्वीटनरचे सेवन करावे असे संशोधकांनी म्हटले आहे.









