वृत्तसंस्था / नवी दिल्ली
झीशान आली यांनी भारताच्या डेव्हीस चषक टेनिस संघाच्या प्रशिक्षकपदाचा त्याग केला आहे. बुधवारी त्याने ही घोषणा केली. भारतीय संघ पुढच्या महिन्यात डेव्हीस चषकासाठीच्या पुढच्या फेरीत स्वीडनशी संघर्ष करणार आहे. मात्र, त्याआधीच झीशान अली याने प्रशिक्षपकपद सोडत असल्याची घोषणा केली.
2013 मध्ये त्याची नंदन बाळ यांच्या स्थानी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीनंतर भारताचा भारतात दक्षिण कोरियाच्या संघाशी सामना झाला. गेली 11 वर्षे तो भारतीय डेव्हीस चषक संघाचा प्रशिक्षक होता. पाकिस्तानशी पाकिस्तानात झालेल्या सामन्यात त्याने भारताचे नेतृत्व या वर्षाच्या प्रारंभी केले होते. खेळाडूने प्रशिक्षण होणे आणि प्रशिक्षकाने पुन्हा खेळाडू या नात्याने संघाचे नेतृत्व करणे, असे टेनिसच्या इतिहासात क्वचितच घडले असावे, असेही त्याने आपले त्यागपत्र सादर केल्यानंतर प्रतिपादन केले आहे. स्वत:च्या कार्यकाळासंबंधी त्याने समाधानही या त्यागपत्रात व्यक्त पेले आहे.









