झंडू कुमार
► वृत्तसंस्था / बीजिंग (चीन)
बीजिंगमध्ये भारताच्या झंडू कुमारने जागतिक पॅरा पॉवरलिफ्टिंग विश्वचषकात पुरुषांच्या 89 किलो गटात कांस्यपदक मिळवत अपवादात्मक कामगिरी केली. झंडूने सलग प्रयत्नांमध्ये 187 किलो आणि 192 किलो अशा दोन शक्तीशाली उचलांसह परीक्षक आणि प्रेक्षकांना प्रभावित केले. त्याच्या कामगिरीने या स्पर्धेत भारताने एकूण पाच पदकांसह आपली मोहीम संपविली. अलिकडील विश्वचषकातील सर्वात चांगल्या कामगिरीपैकी ही एक आहे. पदकांच्या यादी व्यतिरिक्त अनेक भारतीय खेळाडूंनी देखील प्रशंसनीय प्रयत्न केले. आंतरराष्ट्रीय क्रमवारीत उल्लेखनीय यश मिळवले आणि जागतिक पॅरा पॉवरलिफ्टिंग सर्किटमध्ये भारताची उपस्थिती आणखी मजबूत केली.
भारतीय पॅरा पॉवरलिफ्टिंग संघाचे मुख्य प्रशिक्षक जेपी सिंग यांनी एका प्रेस नोटमध्ये संघाच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला. ‘या विश्वचषकात आमच्या खेळाडूंनी ज्या पद्धतीने कामगिरी केली त्याचा मला खूप अभिमान आहे. आज झंडू कुमारचे कांस्यपदक हा एक मजबूत मोहीमेचा परिपूर्ण शेवट होता. अशा स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाच पदके जिंकणे हे आमच्या लिफ्टर्स आणि संपूर्ण सपोर्ट टीमच्या समर्पणाचे प्रतिबिंब आहे. आम्ही सातत्याने पुढे जात आहोत आणि मला विश्वास आहे की पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारतासाठी आणखी मोठे निकाल पुढे येतील,’ असे ते म्हणाले.









