वृत्तसंस्था /लाहोर
पाक क्रिकेट मंडळाच्या नव्या चेअरमनपदी झाका अश्रफ यांची चार महिन्यांच्या कालावधीकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. पीसीबीच्या झालेल्या 10 सदस्यांच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. पाकच्या पंतप्रधानांनी पीसीबीच्या या नव्या व्यवस्थापन समितीला अधिकृत मान्यता जाहीर केल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. पीसीबीची निवडणूक प्रक्रिया काही न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने पीसीबीची 10 सदस्यांची व्यवस्थापन समिती नियुक्त करण्यात आली. या समितीमध्ये पाकचे माजी फलंदाज झहीर अब्बास यांचा समावेश आहे. पीसीबीची निवडणूक 27 जूनला घेण्याचे ठरले होते पण आता ती पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली आहे.









