सावंतवाडी / प्रतिनिधी
कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग सावंतवाडी विधानसभा क्षेत्र येथे मंगळवारी 23 मे रोजी सावंतवाडी येथील रवींद्र मंगल कार्यालय सालईवाडा येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार अरुण उंडे ,उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके ,गटविकास अधिकारी वासुदेव नाईक ,मुख्याधिकारी सागर साळुंके, आदी उपस्थित राहणार आहेत. जिल्हा व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी ए. एस. मोहारे , जिल्हा कौशल्य विकास सहाय्यकआयुक्त ग . प्र. बीटोडे , शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण संस्था सावंतवाडी प्राचार्य एनडी. पिंड. कुरवार आदी मार्गदर्शन करणार आहेत. तरी युवकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयटीआयच्या प्राचार्यांनी केले आहे.








