पुणे येथील आर्ट बिट्स फाऊंडेशनचा पुरस्कार
ओटवणे प्रतिनिधी
माजगाव येथील युवा पखवाज विशारद संकेत सिताराम म्हापणकर याच्या संगित कलेतील सर्वोत्कृष्ट यशाबद्दल त्याला पुणे येथील आर्ट बिट्स फाऊंडेशनचा युवा कला गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.संकेत म्हापणकर याने अल्पावधीत संगित कलेत उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्याच्यापखवाज वादनाने रसिक मंत्रमुग्ध होतात. त्याने विविध संगित स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. त्याच्या या कलेची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
उल्लेखनिय म्हणजे पुणे येथे होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्याला ताल वाद्यांची कला सादरीकरण करण्याची संधी मिळाली आहे. संकेत म्हापणकर याला पखवाज अलंकार महेश सावंत, विजय माधव, एच बी सावंत यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संकेत म्हापणकर याचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.









