वृत्तसंस्था/ लाहोर
पाकचा माजी कर्णधार मोहम्मद युसूफची यापूर्वी पीसीबीने राष्ट्रीय निवड समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान मोहम्मद युसूफने आपल्या या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती पीसीबीच्या प्रवक्त्याने दिली आहे.
काही वैयक्तिक समस्यांमुळे आपण निवड समिती सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे युसूफने पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या वर्षी मोहम्मद युसूफने पीसीबीशी संपर्कात आल्यानंतर विविध पदे भूषविली आहेत.









