वृत्तसंस्था/ जयपूर
युशा नफीस व रुद्रा सिंग यांनी येथे झालेल्या इंडियन ज्युनियर ओपन स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये 19 वर्षाखालील गटात मुलांच्या व मुलींच्या गटाचे जेतेपद पटकावले.
यावर्षी झालेल्या आशियाई कनिष्ठ टीम चॅम्पियनशिपमध्ये भारताने कांस्यपदक मिळविले होते. त्या पथकाचा सदस्य असलेल्या युशा नफीसने पिछाडी भरून काढत पाच गेम्सच्या झुंजार लढतीत रचित शहाचा पराभव करून जेतेपद पटकावले. मुलींच्या 19 वर्षाखालील गटात रुद्राने व्योमिका खंडेलवालवर सरळ गेम्सनी विजय मिळवित जेतेपद मिळविले. आठवडाभर चाललेल्या या स्पर्धेत 12 प्रकारात 520 खेळाडूंनी भाग घेतला होता.









