कोल्हापूर :
राज्यातील रिक्षा चालकांमध्ये औत्सुक्याचा विषय बनून गेलेल्या कोल्हापुरातील रौप्यमहोत्सवी रिक्षा सौंदर्य स्पर्धेतील ब गटात उठावदार, लक्षवेधी ठरलेल्या युनूस मौलवी यांच्या रिक्षाने (एमएच-09-ईएल-5000) पहिला क्रमांक पटकावत महाराष्ट्र सुंदरीचा किताबही मिळवला. तसेच याच स्पर्धेच्या अ गटा ऊबाबदार म्हणून उपस्थितांच्या डोळ्या भरलेल्या गडहिंग्लजच्या तानाजी देवार्डे यांच्या रिक्षाने (एमएच-09-ईएल-5013) पहिला क्रमांकासह कोल्हापूर सुंदरीचा किताब प्राप्त केला. प्रजासत्ताकदिनानिमित्त महाराष्ट्र रिक्षा चालक सेना व शिवाजी पेठेतील निवृत्ती चौक रिक्षा मित्र मंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात झालेली ही स्पर्धा पाहण्यासाठी शहरासह आजूबाजूच्या गावांमधील शेकडो रिक्षा चालकांसह अनेकांनी गर्दी केली होती.
कोल्हापुरातील रिक्षा सौंदर्य स्पर्धेत राज्यात कुठे कुठे पोहोचली आहे हे सातारा, रत्नागिरी, देवऊख, सोलापूर, पंढरपूर, पुणे, बेळगाव व कोल्हापूर येथील 46 रिक्षा चालकांनी स्पर्धेत घेतलेल्या सहभागातून दिसून आले. घरातील सदस्यांप्रमाणे जपलेल्या रिक्षांच्या सजावटींवर तर दीड ते अडीच लाख ऊपये खर्च केल्याचे खुद्द रिक्षा चालकांनीच सांगितले. स्पर्धेतील सहभागी रिक्षाची सजावट सर्वांना पहायला मिळावी यासाठी उंच रॅम्प उभारला होता. अशा या आगळ्या वेगळ्या स्पर्धेतील अ गटात कोल्हापूचे अतुल पोवार यांच्या रिक्षाने (एमएच-09ईल-4830) दुसरा क्रमांक आणि मलकापूर (ता. शाहूवाडी) येथील सरताज हमी मालदार यांच्या रिक्षाने (एमएच-09ईएल-4243) तिसरा क्रमांक मिळवला. तसेच पंढरपूरच्या ओंकार बसाप्पा उगी यांच्या रिक्षाने (एमएच-12-सीटी-9655) उत्तेजनार्थ बक्षीस जिंकले. याचबरोबर ब गटात देवऊख (रत्नागिरी) येथील साई पुसाळकर यांच्या रिक्षाने (एमएच-08-के-3598) दुसरा आणि बेळगाव येथील ईजास शेख यांच्या रिक्षाने (केए-22-सी-2765) तिसरा क्रमांक मिळवला. पुण्यातील अनिकेत पाटील यांच्या रिक्षानेही (एमएच-12-क्यूई-4870) उत्तेजनाथ बक्षीस पटकावले. स्पर्धेतील सर्व रिक्षांचे मनोज दरेकर व विलास गवळी यांनी परीक्षण केले.
बक्षीस वितरण शिवसेनेचे (ठाकरे गट) सहसंपर्क प्रमुख विजय देवणे व माजी नगरसेवक प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या हस्ते स्पर्धेतील अ व ब या दोन्हीही गटात पहिला क्रमांक पटकावलेल्या मौलवी व देवार्डे यांच्या रिक्षाला 25 हजार ऊपये व चषक देऊन गौरवले. तसेच दोन्ही गटात दुसरा व तिसरा क्रमांक मिळवलेल्या रिक्षांनाही अनुक्रमे प्रत्येकी 15 हजार 25 ऊपये व 10 हजार 25 ऊपये व चषक देऊन सन्मानित केले. तसेच दोन्हीही गटातील उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केलेल्या रिक्षाही प्रत्येकी 5 हजार 25 ऊपये व चषक देऊन गौरवले. यावेळी महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे जिल्हा प्रमुख व निवृत्ती चौक रिक्षा मित्र मंडळाचे अध्यक्ष राजू जाधव, महेश उत्तुरे, किरण पडवळ, निलेश कदम, शामराव पाटील व आशिष मांडवकर, संदीप जाधव, उदय देशमाने, दीपक पोतदार, सचिन केळकर, रमांकात गायकवाड, नितीन वगदे, गणेश जोशी, तेजस जाधव आदी उपस्थित होते.
- रिक्षांमध्ये दिसल्या सर्व सोयी–सुविधा…
एखाद्या घरात वातानुकुलीत, फ्रीज, महिलांसाठी मेकअप बॉक्स, बच्चे कंपनीसाठी चॉकलेटस्, फायर सिलिंडर आदी सोयी–सुविधा असणे स्वाभाविक आहे. पंरतू याच सोयी–सुविधा रिक्षामध्ये उपलब्ध असतील तर त्या प्रवाशांना नक्कीच सुखद धक्का देऊन जातील. रिक्षा सौंदर्य स्पर्धेतील बहुतांश रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षाला आकर्षक सजावट करताना सोयी–सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिली होता. जीपीएस सिस्टीम व रिव्हर्स कॅमेरेही लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.








