कीव्ह :
युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी उपपंतप्रधान यूलिया स्विरीडेंको यांना देशाच्या भावी पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यूलिया यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे. त्या आर्थिक विकास, व्यापार मंत्री म्हणून देखील कार्यरत राहिल्या आहेत. युक्रेनच्या चेर्निहीव येथे जन्मलेल्या यूलिया सध्या 39 वर्षांच्या असून त्या 2021 पासून उपपंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.









