वृत्तसंस्था/ ब्रिस्बेल
येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील ब्रिस्बेल आंतरराष्ट्रीय पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत भारताचा युकी भांब्री आणि त्याचा हॉलंडचा साथीदार रॉबिन हेसने दुहेरीची उपांत्यफेरी गाठली आहे. या जोडीने दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अमेरिकेच्या लेमन्स आणि विथ्रो यांचा 7-6 (7-5), 7-6 (8-6) असा पराभव केला. हा सामना 100 मिनिटे चालला होता. दिल्लीच्या भांब्रीने मॅलोर्का येथे झालेल्या एटीपी टूरवरील टेनिस स्पर्धेत पुरूष दुहेरीत पहिले विजेतेपद मिळविले होते.









