वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा युकी भांब्री व त्याचा अमेरिकन साथीदार रॉबर्ट गॅलोवे यांनी अंतिम प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली, पण अखेर त्यांना बोरडॉ एटीपी चॅलेंजर स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
दुसरे मानांकन मिळालेल्या या जोडीला पोर्तुगालचा फ्रान्सिस्को काब्राल व ऑस्ट्रियाचा लुकास मीडलर या चौथ्या मानांकित जोडीकडून 6-7 (1-7), 6-7 (2-7) असा पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या एन. श्रीराम बालाजी व सुमित नागल यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. पण त्यांना वेगवेगळ्या टप्प्यावर पराभूत व्हावे लागले.









