कंपनीच्या सीईओपदी नियुक्ती : 2008 ला गूगलमध्ये प्रवेश : 2013 रोजी 544 कोटीचा मिळाला बोनस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय वंशाचे नील मोहन यांची आता यूट्यूबचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी नील मोहन हे यूट्यूबचे सीपीओ म्हणून कार्यरत होते. नील मोहन 2008 पासून गूगलवर काम करत आहेत. 2013 मध्ये कंपनीने त्यांना 544 कोटी रुपयांचा बोनस दिला होता.
आता नील मोहन हे माजी सीईओ सुसान डियान वॉजकिकी यांची जागा घेणार आहेत. सुसानने नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 54 वर्षीय वॉजकिकीला तिच्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचा आहे. तसेच, तिला तिच्या आरोग्यावर आणि वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळेच ती पद सोडत आहे. ती 2014 मध्ये यूट्यूबची सीईओ बनली होती, आता सुसानने नीलचे यूट्यूबचे सीईओ झाल्याबद्दल अभिनंदन केले.
नील यांचा प्रवास
नील मोहन यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले. नीलने त्याचे करिअर ग्लोरिफाईड टेक्निकल सपोर्ट येथे सुरू केले, जिथे त्याला 60,000 डॉलर पगार मिळाला. याशिवाय, नीलने अॅक्सेंचरमध्ये वरिष्ठ विश्लेषक म्हणून काम केले आहे. 2008 मध्ये गूगलमध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून रुजू झाले. 2015 मध्ये त्यांना यूट्यूबचे मुख्य उत्पादन अधिकारी बनवण्यात आले.









