जगभरातील ग्राहकांना जाणवल्या समस्या
नवी दिल्ली :
व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबला मंगळवारी जागतिक बंदचा सामना करावा लागला. आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाऊनडेटेक्टरने या संदर्भात अहवाल दिला, की जगभरातील हजारो वापरकर्त्यांना यूट्यूब हाताळताना अनेक समस्या येत आहेत. यूट्यूबवर स्वाक्षरीचे व्हिडिओ प्ले होत नसल्याबद्दल नेटिझन्सनी ट्विटरवर देखील तक्रार नोंदवली. उपलब्ध माहितीनुसार मंगळवारी सकाळी 5.30 च्या सुमारास आउटेजमध्ये वाढ नोंदवण्यात आली. आउटेजचे कारण अद्याप समजू शकलेले नाही आणि यूट्यूबने अद्याप या प्रकरणावर मत व्यक्त केलेले नाही. तथापि, ट्विटरवरील एका वापरकर्त्याने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आणि टीम यूट्यूबने उत्तर दिले, ‘आम्हाला कळवल्याबद्दल धन्यवाद! आम्ही ते पाहतो’
कोटक बँकेचे समभाग वधारले
मुंबई : मंगळवारी शेअर बाजारामध्ये कोटक महिंद्रा बँकेचे समभाग 5 टक्के इतके वधारताना दिसले. सलग सातव्या सत्रामध्ये बँकेचे समभाग तेजीमध्ये राहिले असून समभाग मंगळवारी बाजारात 5 टक्के वाढत 1847 रुपयांवर पोहोचला होता. याआधीच्या सत्रामध्ये सदरचा समभाग 1758 रुपयांवर बंद झाला होता. मॉर्गन स्टॅनले यांनी सदरचा समभाग आणखी तेजी राखू शकतो असे अंदाज वर्तवला आहे.









