गोवा कॅन संस्थेचे अध्यक्ष रोनाल्ड मार्टिन यांचे आवाहन
प्रतिनिधी / पणजी
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत वाहन चालकांसाठी विद्यार्थी, युवावर्गाने पुढाकार घेऊन जनजागृती करावी. यामुळे अपघाताच्या प्रमाणात मोठी घट होऊ शकते, असे प्र्रतिपादन गोवा कॅन या संस्थेच अध्यक्ष रोनाल्ड मार्टिन यांनी मिरामार येथे केले.
रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त मिरामार येथील व्ही. एम साळगावकर कायदा महाविद्यालय, विद्यार्थी, धेंपे महाविद्यालय मिरामार व गोवा कॅन या एनजीओ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मिरामार येथील सर्कल परिसरात जागृती मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी साळगावकर कायदा महाविद्यालाचे असोसिएट प्राध्यापक डॉ. के श्रीनिवास राव, धेंपे महाविद्यालयाच्या साहाय्यक प्राध्यपिका सिद्धी पार्सेकर, विद्याथा, वाहतूक खात्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक गुरुनाथ तळेकर, ‘कॅन’चे इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर केला जात नाही, चारचाकी वाहन चालक सिटबेल्ट लावत नाहीत. बस चालक, अवजड वाहनांचे चालकही अनेकवेळा नियमांचे उल्लंघन करताना दृष्टीस पडतात. त्यामुळे गंभीर अपघात घडून जीवावर बेतण्याचे प्रकार घडतात. याला आळा घालण्याची काळाची गरज आहे. स्वतःसह दुसऱयाची काळजी करणे वाहनचालकांचे कर्तव्य आहे. यासाठी वाहतूक नियमांची जागृती मोहीम राबवणे हे युवकांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे, असेही मार्टिन रोनाल्ड म्हणाले.









