बेळगाव-बागलकोट राज्य महामार्गावरील घटना
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-बागलकोट राज्य महामार्गावरील बाळेकुंद्री-होन्नीहाळ दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याचे दोन्ही पाय पूर्णपणे निकामी झाले आहेत. महांतेश सनदी (वय 35) असे त्याचे नाव आहे.
अपघाताची माहिती मिळताच मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन महांतेशला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून बेळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविले. या अपघाताची मारिहाळ पोलीस स्थानकात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.









