कानूर वर्ताहर
कानूर खुर्द तालुका चंदगड येथील तरुण सुनील गंगाराम गावडे (वय-35) सातारा नजीक भुईज जवळ पुलावरून गाडी कोसळून ठार झाला. ही घटना सायंकाळी 4 च्या दरम्यान घडली. अपघातानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.
कानूर खुर्द येथील सुनील गावडे हा तरुण गोवा येथे हॉटेलमध्ये काम करत होता. तो काही दिवसापूर्वी कानूर येथे आला होता. काल सकाळी नऊ वाजता तो पुण्याकडे दुचाकीने निघाला होता दरम्यान, सातारा नजीक भुईज जवळ आणेवाडी टोल नाक्याशेजारील पुलावरून खाली कोसळला व ठार झाला. त्याच्या मागे पत्नी, दोन मुलगे, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









