सातारा :
धनगरवाडी (ता. सातारा) येथील 25 वर्षीय युवकाला त्याच्या मित्रांनी दांडक्याने मारहाण केल्याने यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. अक्षय माने असे त्याचे नाव आहे. त्याची बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यात प्रथमेश चव्हाण, रोहन जाधव, योगेश खवळे आणि एका मित्रावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय माने याचा मित्र धनंजय यादव हा गुरूवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घरी आला. त्याने अक्षय यास पार्टीला चल असे म्हणाला, तेव्हा अक्षयने येण्यास नकार दिला. तुम्ही दारु पिल्यावर जुनी भांडणे काढुन माझ्यासोबत भांडणे करता असे म्हणाला. तरी सुद्धा धनंजय अक्षयला पार्टीला येण्यासाठी आग्रह करित होता. तेव्हा अक्षयने पार्टीला कोठे जायचे आहे. व कोण कोण आहे असे विचारले असता धनंजय यादव याने गोडोली येथील पाच एकरचे प्लॉटमध्ये पार्टी असून, पार्टीला मी, प्रथमेश चव्हाण, रोहन जाधव, योगेश खवळे आणि एकजण मित्र असे आहे असे सांगितले. त्यानंतर धनंजय यादव जास्त आग्रह करित असल्याने अक्षय हा धनंजय सोबत पार्टीसाठी घरातुन गेला. त्यानंतर हे मित्र दारू पिल्यावर त्यांच्यात जुन्या भांडणातून वाद झाला. या वादातून धनंजय यादव, प्रथमेश ऊर्फ पत्या, रमेश चव्हाण, योगेश खवळे, रोहन नामदेव जाधव व त्यांचा आणखी एक मित्र (सर्व रा कोडोली, सातारा) यांनी अक्षयला दांडक्याने डोक्यात, पाठीत, हातावर, पायावर मारहाण करून गंभीर जखमी केले.
- अक्षय उपचारापूर्वीच मयत
अक्षयला जखमी अवस्थेत ठेऊन हे चौघेही तेथून निघून गेले. त्यानंतर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्याची बहिण दिपाली केंजळे हिला लाला शेडगे यांनी फोन करून अक्षयला जिल्हा शासकीय रूग्णालयात नेल्याची माहिती दिली. यामुळे दिपाली, तिची आई व मावशी रूग्णालयात पोहोचल्या. अक्षय हा उपचारापुर्वीच मारहाणीत मयत झाला असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. यानंतर दिपालीने सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघाविरूद्ध तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.








