विकासाचं स्वप्न मनाशी बाळगून समाजकारणात उतरलेलं व्यक्तिमत्त्व
सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यातील संस्थान काळापासून अत्यंत महत्त्वाचा असा भाग म्हणजे आंबोली- चौकूळ. निसर्गरम्य ठिकाण म्हणून जागतिक पर्यटन नकाशावर या दोन्ही गावांची ओळख वेगळीच आहे. अशा या पर्यटन गावाचा विकास व्हावा, सावंतवाडी तालुक्यापासून 30 ते 40 किलोमीटर अंतरावर चौकूळ गाव आहे . या गावची स्थिती विकासात्मक दृष्ट्या अत्यंत दयनीय आहे. अशा या भागाचा विकास आणि येथील जनतेच्या वीज, पाणी ,रस्ते ,आरोग्य ,या अत्यंत महत्त्वाच्या समस्या सोडवण्यासाठी नेतृत्वाचा अभाव आहे. आणि हा अभाव दूर करण्याच्या दृष्टीने युवा नेतृत्व दिनेश शिवाजी गावडे हे आंबोली चौकूळ जिल्हा परिषद मतदार संघाच्या जनतेतले हक्काचे प्रतिनिधी म्हणून गेल्या तीन-चार वर्षापासून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तळमळीने भाग घेत आहेत. समस्या कुठलीही असो युवकांच्या स्वतःच्या जीवाची फिकीर न करता ते जनतेच्या सेवेसाठी हजर असतातच .साधी राहणी हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आणि गावातील जनतेच्या विकासाचं स्वप्न मनाशी बाळगून समाजकारणात दिनेश गावडे यांनी एन्ट्री केली आहे. समाजकारण ,राजकारण या माध्यमातून जिल्हा परिषद मतदार संघात एक नव उगवतं युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. चौकुळ ,आंबोली जिल्हा परिषद मतदार संघाला सावंतवाडीतच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक वेगळच महत्त्व आहे . या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलेले सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ गावडे ,जिल्हा परिषदेचे माजी सभापती भरत गावडे यांच्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत गावडे , जि प सदस्य प्रकाश गावडे या सामाजिक राजकीय अध्यात्मिक क्षेत्रातील मातब्बर अशा या व्यक्तींच्या कार्यपद्धतीला साजेशे कार्य तब्बल दहा वर्षानंतर दिनेश गावडे यांच्या रूपाने पुढे येत आहे. गेल्या पाच वर्षापासून कोल्हापूर येथील व्यवसाय सांभाळत आपल्या मूळ चौकूळ, आंबोली भागात कार्य करण्यासाठी ते तत्पर झाले आहेत. त्यांचा आज २२ जुलैला 37 वा वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने त्यांच्या एकंदरीत दानशूर व्यक्तिमत्त्वाच्या पैलूवर टाकलेला हा प्रकाश…. !









