कोल्हापूर :
कोल्हापूर – बाजार भोगाव रस्त्यावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या धडकेत अशोक बंडू वाळवेकर (वय 38, रा. तळेवाडी, ता. पन्हाळा) हा तरुण ठार झाला. तर दत्ता भिवा चव्हाण (रा. पानारवाडी, ता. पन्हाळा), सचिन नारायण तिऊके (रा. सावर्डे, ता. शाहूवाडी) अशी दोघा जखमींची नावे आहेत. या दोघापैकी दत्ता चव्हाण हा गंभीर जखमी असून, त्याला उपचारासाठी कोल्हापूरातील एका खासगी ऊग्णालयात तर सचिन तिऊके याला सीपीआरमध्ये दाखल केले आहे. हा अपघात गुऊवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास झाला असून, याची रात्री उशिरा कळे पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
अशोक वाळवकेर आणि त्याचा मित्र दत्ता चव्हाण हे दोघे दुचाकीवऊन शेतातील पिकासाठी किटकनाशक घेऊन बाजार भोगावहून गावाकडे येत होते. तर जखमी सचिन तिऊके हा तऊण कामावऊन दुचाकीवऊन गावाकडे जात होता. याच्या दुचाकीची कोल्हापूर–बाजार भोगाव रस्त्यावरील काटेभोगाव गावानजीकच्या सखाराम झेंडे याच्या घरासमोर समोरासमोर धडक झाली. या धडकेने दुचाकीवऊन तिघेही उडून रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. या तिघांनाही उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच अशोक वाळवेकर याचा मृत्यू झाला. तर जखमी दत्ता चव्हाण याची प्रकृती अधिकच बिघडल्याने, त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील एका खासगी ऊग्णालयात दाखल केले. या अपघाताची माहिती समजताच मयत अशोक वाळवकेर आणि जखमी दत्ता चव्हाण, सचिन तिऊके याच्या नातेवाईकांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. जखमी दत्ता चव्हाण हे गवंडी काम करतात. तर मयत अशोक वाळवेकर हा शेती करत होता अशी माहिती पोलिसांनी दिली.








