चिपळूण :
मुंबई-गोवा महामार्गावरील शहरातील बहादूरशेख नाका येथे टेम्पो-दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात टॉवर टेक्निशियन असलेल्या यवतमाळ येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८.४५च्या सुमारास घडली. बहादूरशेख नाका ते पॉवर हाऊसदरम्यान अपघाताची ही दुसरी घटना असून पंधरा दिवसात दोन तरुणांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. या अपघातानंतर टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला.








