वृत्तसंस्था / कोईंमतूर
11 व्या युवा कबड्डी मालिकेला येथे शनिवारी विभागीय सामन्यांनी प्रारंभ झाला. या स्पर्धेमध्ये 21 राज्यातील 26 संघांचा समावेश आहे. तर 2025 च्या फेब्रुवारीमध्ये या स्पर्धेतील होणाऱ्या अंतिम टप्प्यात (ग्रॅन्ड फिनाले) 12 संघांचा समावेश राहिल.
या स्पर्धेतील विभागीय सामन्यांतील टप्प्याला (तीन टप्पे) शनिवारपासून प्रारंभ झाला असून ते 10 जानेवारीपर्यंत खेळविले जातील. सदर स्पर्धेतील सामने सिंगल राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविले जातील. ग्रॅन्ड फिनालेसाठी तीन विभागातून किमान 6 संघ पात्र ठरतील. ग्रॅन्ड फिनाले टप्पा जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान खेळविला जाईल. या टप्प्यात 12 संघ सहभागी होतील. विभागीय टप्प्यातील विजेत्या संघांना रोख रक्कमेची बक्षीसे दिली जातील. ग्रॅन्ड फिनाले टप्प्यातील विजेत्या संघाला 15 लाख रुपयांचे तर उपविजेत्या संघाला 5 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.









