प्रतिनिधी /म्हापसा
करासवाडाहून पर्वरीच्या दिशेने जाणाऱया कार चालकाने अचानक कार हळू करून रिव्हर्स घेत सर्व्हीस रोड गाठण्याचा प्रयत्न करीत असताना पाठीमागून येणाऱया ऍक्टिव्हा चालकाने कारवर जोरदार धडक दिल्याने ऍक्टिव्हा चालक ………हा युवक जबर जखमी झाला असून त्याचे दोन्ही हात जायबंदी झाले आहेत व त्याच्या गुप्तांगाला जबर मार लागल्याने गंभीर अवस्थेत त्याला गोमॅकोत अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. सदर कार पेडणे येथील ट्राफिक पोलिसाची असल्याने म्हापसा पोलीस त्या दुचाकीवाल्याचीच चूक असल्याचे दाखवून हे प्रकरण त्याच्यावर डावललण्याचा डाव आखत असल्याची माहिती हाती आली आहे. याबाबत आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी जखमीच्या कुटुंबियांनी केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दु. 2 वाजण्याच्या दरम्यान मारुती कार जीए-01 एस-8055 कार चालक पणजीच्या दिशेने जात असता मध्ये त्याला सर्व्हीस रोडहून गिरीच्या दिशेने जायला हवे होते मात्र सर्व्हीस रोडच्या पुढे 50 मीटर गेल्यानंतर पुन्हा सर्व्हीस रोडवर येण्यासाठी कार मागे घेत असता पाठीमागून येणाऱया जीए-11 एफ -5822 कायनॅटिकने कारच्या पाठीमागे जोरदार धडक दिली असता ते जबर जखमी झाले. रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले. त्याचे दोन्ही हात मोडले असून पायालाही जबर जखम झाली आहे. सदर कार एका ट्राफिक पोलिसाची असल्याची माहिती उघड झाल्यावर म्हापसा पोलिसांनी हा पंचनामा वेगळा करून आपल्या पोलिसाला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. कायनॅटिक चालक जबर जखमी असून याबाबत पुढील चौकशी सुरू आहे.









